कुकु सबजी

पालेभाज्यांचे ऑमलेट


साहित्य

तीन / चार अंडी


एक वाटी बारीक, स्वच्छ केलेला पालक ५० ग्रॅम


एक वाटी बारीक, स्वच्छ केलेली कांद्याची पात ५० ग्रॅम


एक वाटी बारीक, स्वच्छ केलेली कोथंबीर + (पारस्ली मिळाल्यास) ५० ग्रॅम


अर्धी वाटी बारीक, स्वच्छ केलेली मेथी पाने व शेपु २५ ग्रॅम


अक्रोड २५ ग्रॅम


मीठ, मीरी, हळद चवी नुसार


तूप २ मोठे चमचे



कृती - १ मोठा चमचा तूप कढईत गरम करून त्यात सगळ्या भाज्या एकत्र करून पाणी सुकेस्तोवर परतुन घ्या. ते मिश्रण बाहेर ताटलीत पसरून थोडे थंड करा. एका भांडयात ३ - ४ अंडी, थंड झालेले भाजी मिश्रण, मीठ, मीरी, हळद चवी नुसार व अक्रोडचे बारीक केलेले तुकडे एकत्र करून घोळून घ्या. गरम कढईत एक मोठा चमचा तूप घालून त्यावर मिश्रण ओता. ऑमलेटच्या दोन्ही बाजू छान परतून घ्या. ऑमलेट ताटलीत थंड होत असताना सजावट म्हणून अक्रोडचे मोठे तुकडे दाबून बसवा. चपाती किंवा पावा बरोबर खायला तयार.



फोटो - विनायक रानडे. कॅमेरा - नीकॉन पी ९०.