कुकु सिबजामीनी

कुकु सिबजामीनी ही इराणी पाक कृती आहे. सिबजामीनी = जमीनीतले सफरचंद = बटाटे.

साहित्य:

उकडलेले बटाटे - ३ नग


अंडी - ३ नग


दही - दोन मोठे चमचे


लसूण व हिरवी मीरचीचा ठेचा चवी नुसार


मीठ, मिरपुड व हळद चवी नुसार


एक चमचा तूप किंवा लोणी परतण्याकरता


कृती: उकडलेल्या बटाट्यांना कुस्करून घ्या. ३ अंडी फोडून एकजीव करा. लसूण/मीरची ठेचा, हळद, केशर व दही मीसळून एकजीव करा. तव्यावर एक चमचा तूप किंवा लोणी घालून खरपूस होइस्तोवर भाजून घ्या.



नु शे जान म्हणजेच मस्त खा आणि स्वस्थ राहा!
हा प्रकार शाकाहारी करण्याकरता अंड्या ऐवजी एक चमचा भाजलेले बेसन / भाजणी / तांदूळाची पीठी वापरा.

फोटो - विनायक रानडे. कॅमेरा - नीकॉन पी ९०.

No comments: